ब्राम्हणी : जगदंबा क्रिकेट क्लब ब्राह्मणी आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेत जगदंबा संघ सोनई विजेता ठरला.
प्रायमस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,नेवासा फाटा डॉ. निलेश लोखंडे यांच्यावतीने 15000 रु. प्रथम पारितोषिक तर,उपविजेता ठरलेल्या D. C. C.दत्तनगर श्रीरामपूर या संघाला योगेश निकम,शेखर जाधव, श्रवण जाधव यांच्याकडून 7000 रु. बिक्षिस देण्यात आले.यावेळी माऊली राजदेव, अजित हापसे उपस्थित होते.4 व 5 ऑक्टोबर दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जगदंबा क्रिकेट क्लब ब्राह्मणी यांनी परिश्रम घेतले.













