Home अहमदनगर ब्राह्मणीकरांच स्वर्गरथाच स्वप्न पूर्ण

ब्राह्मणीकरांच स्वर्गरथाच स्वप्न पूर्ण

121
0

ब्राम्हणी – गावासह परिसरातील गावासाठी लोकोपयोगी येणारा स्वर्गरथ 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून तयार करण्यात आला असून सदर स्वर्गरथाचे शुक्रवार 17 जानेवारी रोजी सकाळी 9.30 देवी लोकार्पण करण्यात येणार येत असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच सौ. सुवर्णा सुरेशराव बानकर यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.

मृत्यूनंतरची वाटदेखील सुकर व्हावी, मृत शरीराला खांदा देऊन स्मशान घाटापर्यंत होणारा प्रवास करण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता स्वर्गरथ तयार करण्यात आला.याचा उपयोग ब्राम्हणी गावासह चेडगाव, मोकळ ओहोळ, केंदळ, उंबरे,वंजारवाडी आदी गावांना होणार आहे.

ब्राम्हणी स्मशान भूमीतील भौतिक सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत. अंत्यविधी व दशक्रिया विधी दोन्ही विभाग स्वतंत्रपणे करण्यात आली. दोन्ही बाजूला ग्रामपंचायत च्या निधीतून प्लेविन ब्लॉक बसविण्यात आले आहे. निसर्गरम्य परिसर भरपूर झाडे असल्याने सावली भरपूर असते.त्यामुळे ब्राम्हणी गावची स्मशानभूमी परिसरातील अन्य गावांना परिसर आदर्शवत ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here