सोनई – मकर संक्रांत सणाच्या निमित्ताने स्मार्ट किड्स विद्यालयात घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात सोनई येथील सविता संतोष ढाले यांनी पैठणी व सोन्याची नथ पटकावली आहे. द्वितीय क्रमांक ज्योती गोरक्षनाथ शिंदे तर तृतीय बक्षीस जयश्री योगेश दहातोंडे यांनी जिंकले आहे. स्पर्धेत दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता.
सोनईतील होम मिनिस्टर मध्ये सविता ढाले पैठणीच्या मानकरी.उपविजेत्यांना सोन्याची नथ व भेटवस्तू देण्यात आले.अंतिम फेरीत निवड झालेल्या वृषाली झिने प्रिती सिंहमार, अनिता देशमाने, अर्चना पुरी,प्रियंका अंबिलवादे, पल्लवी कदम व तेजस्विनी ढाले यांना आकर्षक बक्षीस देण्यात आले.
प्रथम फेरीत सामुहिक नृत्य सादरीकरण करण्यात आले. यातून एकत्र संख्याची घोषणा करुन विजेत्या महिलांची निवड करण्यात आली. यानंतर समालोचक गणेश हापसे यांनी विविध संकल्पना राबवून खेळाची रंगत वाढविली. उपस्थित महिलांत अन्य २६ बक्षीस देण्यात आले.
















