
ब्राम्हणी : आपल्याला कोणता पक्ष महत्वाचा नाही,तर शेतकरी टिकला पाहिजे.आपल्या न्याय हक्कासाठी व सरकार विरोधात लढण्यासाठी शेतकरी संघटना महत्वाची असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजितराव काळे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावात शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन प्रसिद्ध कायदे तज्ञ अजितराव काळे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी ते बोलत होते. यावेळी ब्राह्मणी शाखेचे अध्यक्ष संजय मोकाटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शेतकरी वर्गावर होणारा अन्याय याबाबत उदाहरणासह सांगितले. राजकारणबाजूला ठेवून गावातील शेतकऱ्यांना आता गरज पडेल त्यावेळी एकत्र यावे असे आवाहन मोकाटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक विश्वनाथ हापसे सर होते.यावेळी सुरेशराव बानकर, रंगनाथ मोकाटे,महेंद्र तांबे,डॉ.राजेंद्र बानकर,चंद्रभान राजदेव, भाऊ तारडे,सूर्यभान मोकाटे,शेतकरी संघटनेचे तालुका पदाधिकारी अमोल मोढवे ,शरद आसने,नारायण टेकाळे,सुजित बोडखे,अशोक टेकाळे,राजेंद्र टेकाळे,भास्कर जाधव,साहेबराव चोरमले आदी उपस्थित होते.ब्राम्हणी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी संजय रामदास मोकाटे तर,उपाध्यक्षपदी राजेंद्र राजदेव,सचिवपदी डॉ.काका राजदेव, खजिनदारपदी पोपट मोकाटे यांची निवड करण्यात आली. ब्राह्मणी शाखेच्या कार्यकारणीतील सर्व सदस्यांचा काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अवघ्या एक दिवसात कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्वांनी संघटनेच्या सदस्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी केले.












