ब्राम्हणी -आमदार शिवाजीराव कर्डिले हे १९७२ च्या दुष्काळा दरम्यान ब्राम्हणी गावात राहिले.चाऱ्याचा प्रश्न होता.त्यावेळी म्हशी आणि गाई त्यांनी चरण्यास घेवून जाण्याचे काम केल्याची आठवण ब्राह्मणीकरांना कायम आहे.याचीच जाणीव ठेवून त्यांनी सतत ब्राह्मणीला प्रेम देवून विकास कामात झुकते माप दिल्यामुळे ब्राह्मणी गावाच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. यापुढेही त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे या शोकसभेत ग्रामस्थांनी सांगितले.
ब्राह्मणी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील प्रांगणामध्ये ब्राम्हणी गावच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी कर्डिले यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
काम असेल तर कधीही ‘नाही’ म्हंटले नाही. स्व. कर्डिले यांनी नगर जिल्ह्याच्या राजकारणात ‘किंगमेकर’ म्हणून काम केले. कधीही कुठल्याही राजकीय पक्षासाठी किंवा स्वतःसाठी नव्हे, तर जनतेसाठी काम करत आले आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमासाठी राहुरी तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रम तांबे, विजयराव बानकर, बाजार समितीचे माजी संचालक रंगनाथ मोकाटे, माणिक तारडे, बाळासाहेब देशमुख, भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, सरपंच सुवर्णाताई बानकर, उपसरपंच महेंद्र तांबे, जालिंदर हापसे,बाबासाहेब ठिकाजी गायकवाड,विश्वनाथ हापसे,गणेश हापसे भाऊसाहेब वने, अशोक नगरे, नारायण हापसे, महिंद्र हापसे, गिरीराज तारडे, शिवाजी राजदेव,प्रभाकर हापसे,भाऊसाहेब तारडे, दत्तात्रय तारडे, लक्ष्मण नवाळे, गणेश तारडे, शांताराम हापसे, विजयराव गायकवाड, भानुदास मोकाटे, माणिक गोरे, डॉ. राजेंद्र बानकर, प्रकाश बानकर, सुदाम बानकर, कृष्णा महाराज जिरेकर, संजय रामदास मोकाटे, रामदास महाराज जरे , रावसाहेब गायकवाड, पोपट हापसे, आदिनाथ वाकडे,महेश हापसे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













