अहिल्यानगर :-‘क्रिएटिव्ह सिझर्स’ हेअरकट स्पर्धा उत्साहात
अहिल्यानगर : फॅशन व ब्युटी क्षेत्रात कार्यरत नवोदित तरुण-तरुणींना स्वतःची कला सादर करता यावी या उद्देशाने आयोजित “क्रिएटिव्ह सिझर्स” या राज्यस्तरीय हेअरकट व स्टायलिंग स्पर्धा अहिल्यानगर शहरात
पार पडल्या.
ग्रूमिंग फॅक्टरी अँड सलून ऍकॅडमी मार्फत २८ जुलै संजोग लॉन्स येथे याचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रूमिंग फॅक्टरी अँड सलून ऍकॅडमी मार्फत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जवळपास अडीच हजार नाभिक समाज उपस्थित होता. तसेच यात राज्यातील विविध शहरातून आलेल्या १४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत मेल फेड हेअर कट स्पर्धेत हर्षद गायकवाड प्रथम, प्रशांत काळे द्वितीय, प्रेम रंगा तृतीय,
फिमेल हेअर कट स्पर्धेत मंगेश वाघ प्रथम, सम्राट साळवे द्वितीय, किशोर राऊत याने तृतीय क्रमांक पटकावला.
टॅटू हेअर कट स्पर्धेत कृष्णा प्रथम, प्रथमेश आत्रे द्वितीय, जयेश औटी याने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धा परीक्षणासाठी सचिन टक्के, प्रियंका वाघमारे, अश्विनी रासवे, अविनाश वाघमारे, मनोहर पवार, युवराज झुंजार, रवींद्र वाघमारे, शंकर डांगे आदी जजेस म्हणून लाभले.
सध्या सलून व्यवसायात तरुणांना खूप मोठी संधी आहे.
त्यासाठी त्यांना योग्य प्लॅटफॉर्म आणि संधी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या. क्रिएटिव्ह सिजर ही हेअर कटिंग स्पर्धा सलून इंडस्ट्रीसाठी राज्यभरात उच्चांक प्रतिसाद देणारी कार्यशाळा ठरली. अशा पद्धतीच्या स्पर्धेत राज्यात प्रथमच या ठिकाणी प्रेक्षक व स्पर्धकांनी उच्चांक गाठल्याचे ग्रूमिंग फॅक्टरी अँड सलून ऍकॅडमीचे संचालक महेश मोरे यांनी सांगितले.













