गणराज्य न्यूज राहुरीफॅक्टरी
राहुरी फॅक्टरी येथील ओम चैतन्य कानिफनाथ भक्त मंडळ यांच्या संकल्पनेतून आणि गुरुवर्य सुरेश आण्णा चव्हाण यांच्या माध्यमातून कानिफनाथ महाराजांचे मंदिराचे भूमिपूजन आज गुरुवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
कराळेवाडीच्या पाठीमागील साई नगरी परिसरात हे भव्य दिव्य मंदिर साकारले जाणार आहे.
मंदिराच्या भूमिपूजनावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे,आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम,राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे,माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, किशोर थोरात, बिट्टू पवार,सुनील सिनारे,चांगदेव खांदे,गोविंद खवडे आदिंसह भाविक भक्तगण उपस्थित होते.
यावेळी त्रिदिनी गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता होऊन महाप्रसाद वाटपाने सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश सीनारे,चंद्रकांत चव्हाण,विकी साळुंके,सुनील जाधव, बंटी भगत, ऋषिकेश शिंदे, भारत गीते, नवनाथ वाकचौरे, अजय गीते, विजय भिसे,भारत मुसमाडे, योगेश दळवी,अजय चौधरी, सुनील गाढे, ओंकार साळुंके, गणेश तांबे, धनंजय गिते,तेजस सिनारे, महेश सीनारे,सचिन शेळके, महेंद्र दोंड,नवनाथ तागड, संदीप शेळके,पप्पू पवळे, संदेश पंडित, युवराज साळुंके,कुणाल साळुंके, सार्थक चव्हाण,ओंकार शिंदे आदिंसह नाथभक्तांनी अथक परिश्रम घेतले.













