ब्राम्हणी
ब्राम्हणी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी म्हणून गत महिन्यात बदली झाल्यानंतर आठ दिवसापूर्वी पदाची सूत्रे हाती घेत संदीप शेटे यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली.
शनिवारी मासिक बैठक पार पडली. पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी ओळख करून घेत..ब्राम्हणी ग्रामपंचायतच दप्तर पाहून कामकाज जाणून घेतले.आज सोमवारी सकाळी नुकसानग्रस्त पिके पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून काम सुरू केले. ब्राह्मणी गावाला एक युवा तडफदार ग्रामविकास अधिकारी मिळाल्याने नागरिकांच्या आता कामकाजाबाबत निश्चित अपेक्षा वाढल्या आहेत.
तत्कालीन ग्रामविकास अधिकारी माणिकराव घाडगे यांनी तब्बल 7 वर्ष 2 महिने ब्राह्मणी गावात उत्कृष्ट काम केले. कोरोना सारख्या अडचणीच्या काळात कौतुकास्पद कामगिरी केली. गावातील दोन्ही राजकीय गटांना ऍडजेस्ट करत त्यांनी काम पाहिले. त्यांचे काम निश्चितच गावच्या आठवणीत राहील.
ब्राम्हणी लोकसंख्या,क्षेत्रफळ,राजकीय सहकार,कृषी,दुग्ध,पशुसंवर्धन, आध्यात्मिक, सांस्कृतिक ऐतिहासिक अशा विविध बाबतीत राहुरी तालुक्यात अग्रगण्य आहे. जागृत गाव म्हणून ब्राह्मणीची ओळख ब्राह्मणी गावात विविध प्रशासकीय विभागात काम करताना अधिकाऱ्यांना सतर्क राहावे लागते. चांगलं काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे गाव कायम कौतुक करत आलय. आता नवीन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून गावच्या विकासाबाबत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













