राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी गावाच वारकरी रत्न,ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक हभप बबन केशव हापसे यांचे आज निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ब्राम्हणी गावी देवीच्या तळ्यावर होणार आहे.
हभप बबन महाराज हापसे पंढरपूरची वारी करत. गावातील विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, प्रवचन यामध्ये कायम सहभाग होता.
अध्यात्मिक आवड व अभ्यास असल्याने त्यांना प्रत्येक कार्याचं आवर्जून निमंत्रण असत. जोडीला शेती सांभाळत आपलं कुटुंब चालवित. एक मुलगा मेजर आहे.तर, दुसरा पुणे परिसरात खाजगी कंपनीत जॉब करत आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी दोन मेजर योगेश व अक्षय दोन मुले आहेत. पोपटराव केशव हापसे यांचे ते बंधू होते.
ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट काम सुरू केलं. चांगला मित्र परिवार जोडला. त्यातून आध्यात्मिक सामाजिक कृषी क्षेत्राशी निगडित काम केलं. ब्राह्मणी परिसरात उत्तम भजनी घडवले. शांत संयमी मितभाषी अस ब्राह्मणीचं व्यक्तिमत्व हभप बबन माऊली आज काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.गणराज्य न्यूज परिवार व वाचकांच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली……














