गणराज्य न्यूज
शनिशिंगणापूर : शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील अनावश्यक नोकरभरती व अन्य तक्रारीबाबत देण्यात आलेल्या ‘४१ डी’ नोटिशीला उत्तर देण्यासाठी मुंबई येथील धर्मादाय आयुक्तांसमोर सर्व विश्वस्तांनी पुन्हा एकदा जाण्याचे टाळले. मुंबई येथील अॅड. समीर जाधव यांनी धर्मादाय आयुक्तांसमोर देवस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने बाजू मांडली. यावेळी मुंबई धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी २० ऑगस्टला पुढील सुनावणीची तारीख दिली आहे.
शनैश्वर देवस्थानातील अनावश्यक नोकरभरती व इतर आरोपांबाबत दिलेल्या ७०० पानांच्या प्रमाणित नक्कलावर सोमवारी (दि.११) देवस्थानचे विश्वस्त मुंबई धर्मादाय कार्यालयासमोर काय बाजू मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, पण विश्वस्तांच्या वतीने अॅड.
समीर जाधव यांनी बाजू मांडली.
यावेळी मुंबई धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी पुढील सुनावणीसाठी २० ऑगस्टला दिली आहे. शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी आरोपांवर १८ व २५ जुलै, तसेच १ व ११ ऑगस्टला म्हणणे मांडले नाही. ३१ जुलैला धर्मादाय उपआयुक्त, पुणे यांनी चौकशी केलेल्या ७०० पानी प्रमाणित नकला देवस्थानला मिळाल्या असून, पुढील सुनावणीला देवस्थानचे विश्वस्त बाजू मांडण्यासाठी जातील का? याबाबत चर्चा होत आहे.













