अहिल्यानगर : शनैश्वर देवस्थानमधील
बनावट ॲप प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ३८ जणांची चौकशी केली आहे. या चौकशीत काहींच्या आर्थिक व्यवहारात गडबड आढळून आली असून, त्यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या रकमांबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित असलेले कर्मचारी व विश्वस्तांचे धाबे दणाणले आहे.













