ब्राम्हणी : श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून हभप स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राम्हणी गावातील देवगड सेवेकरी स्व:खर्चातून ब्राह्मणी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उद्या गुरुवार 11 सप्टेंबर रोजी करत आहेत.
मदत नव्हे कर्तव्य या उपक्रमातून ब्राह्मणी गावात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्याची सुरुवात विद्येच्या मंदिरातून करण्यात येत आहे. गावाचं उद्याचं भविष्य जिथ घडतंय त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वही,पाटी,पेन्सील वाटप करण्यात येणार आहे.













