धानोरी खुर्द
राहुरी तालुक्यात सहकार क्षेत्रात आर्थिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धामोरी खुर्द येथील स्वर्गीय धोंडीभाऊ सोनवणे विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या भव्य नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ सोहळा व पशुखाद्य विक्री दालनाचा तसेच ई सेवा केंद्राचा शुभारंभ 22 ऑक्टोबर रोजी दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 10 वाजता होणार आहे.
स्वर्गीय धोंडीभाऊ सोनवणे सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा
निवृत्त भूमि अभिलेख अधिकारी त्रिंबक भिकाजी सोनवणे व दत्तात्रय कुशिनाथ सोनवणे अध्यक्ष संत भूमी उपासना, पारायण सोहळा मंडळ आळंदी देवाची यांच्या शुभहस्ते सकाळी 10 वाजता धामोरी खुर्द मधील हनुमान मंदिरासमोर तर, स्वर्गीय धोंडीभाऊ सोनवणे विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्था संचलित पशुखाद्य विक्री दालनाचा व ई सेवा केंद्राचा उद्घाटन समारंभ सोहळा सकाळी 11 वाजता रेल्वे स्टेशन,वांबोरी जगदंबा देवी मंदिरासमोर जिल्हा बँकेचे संचालक,डॉक्टर तनपुरे सहकारी कारखान्याचे चेअरमन, राहुरी मार्केट कमिटीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे यांच्या हस्ते व राहुरी तालुका सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.तरी धानोरी खुर्द ग्रामस्थ,सभासद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
धामोरी खुर्द गावच्या वैभवात भर पाडणारी सेवा सहकारी सोसायटीची नूतन वास्तू होत असताना आम्हा सभासदांना निश्चित आनंद होत असल्याची भावना सभासदांनी यावेळी व्यक्त केली.
शेतीचा मुख्य जोड व्यवसाय पशुपालन आहे. जनावरांना आवश्यक पशुखाद्य आता सभासदांना सोसायटीच्या माध्यमातून योग्य दरात मिळणार आहे.याशिवाय विविध योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज व ऑनलाइन कागदपत्रे करण्यासाठी ई सेवा प्रणाली महत्वपूर्ण ठरणार आहे. सभासद शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व आर्थिक विकासासाठी स्वर्गीय धोंडीभाऊ सोनवणे विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्थेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच सभासद शेतकऱ्यांकडून स्वागत केले जात आहे.
इमारत भूमिपूजन व पशुखाद्य दालन व ई सेवा प्रणाली शुभारंभ सोहळ्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन संजय दत्तात्रय हरिश्चंद्रे, व्हाईस चेअरमन विलास विठ्ठल सोनवणे, संचालक संभाजी तुकाराम तुकाराम कल्हापुरे, नारायण उर्फ बाबासाहेब धोंडीराम सोनवणे, भाऊसाहेब दगडू खेडेकर, अँडव्हकेट रामनाथ कुशिनाथ सोनवणे, अशोक रुईचंद पारखे, राजेश रामकृष्ण सोनवणे, नानासाहेब रामदास खेडेकर, भाऊसाहेब पोपट जाधव, सुदाम गंगाधर कुसमुडे, सौभाग्यवती लक्ष्मी विठ्ठल वाडगे, सौभाग्यवती मीराबाई दिलीप कोहकडे,तज्ञ संचालक अर्जुन प्रभाकर गायके, रामनाथ पांडुरंग सोनवणे,सचिव संजय खासेराव शेळके, सहसचिव देवराम दगडू खेडेकर आदींसह आजी-माजी चेअरमन सर्व सभासद, ग्रामपंचायत पदाधिकारी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे.
















