ब्राम्हणी येथील स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.
26 जून हा अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.या दिवसाच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या गैरवापर आणि अवैध तस्करीमुळे होणाऱ्या धोक्यांविषयी जनजागृती केली जाते. याच अनुषंगाने बानकर विद्यालयांमध्ये अमली पदार्थांचे होणारे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आले. तसेच आपले जीवन समृद्ध करण्याच्या हेतूने अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रा.सौ.अश्विनी बानकर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाच्या आहारी न जाता, आपले आरोग्य हीच आपली संपत्ती आहे.ती जपा असे आवाहन करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच विषयावर आधारित निबंध स्पर्धा व घोषवाक्य आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शासनातर्फे आयोजित केलेले अमली पदार्थ विरोधी दिन चर्चासत्रात देखील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.













