गणराज्य न्यूज ब्राम्हणी – उंबरे,केदळ शिवेवरील श्री.सिद्धिविनायक मंदिर टेंभी येथे श्री गणेश जयंती निमित्त आज बुधवारपासून 7 फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ होत आहे..तरी परिसरातील गणेश भक्तांनी दररोज आयोजित धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
श्री गणेश जयंती उत्सवाचे यंदाचे 19 वे वर्ष आहे. किर्तन महोत्सवानिमित्त नामांकित महाराजांची दररोज सायंकाळी 7 ते 9 किर्तन होणार आहे. उत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, भगवे झेंडे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
आज पहिल्याच दिवशी माऊली महाराज मोरे ब्राह्मणीकर यांचे किर्तन होणार आहे. गुरुवारपासूनची कीर्तन सेवा क्रमशः मृदुंग महर्षी केशव महाराज जगदाळे, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर, गोविंद महाराज गोरे, गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगली शास्त्री, विनोदाचार्य दयानंद महाराज कोरेगाव, स्वामी प्रकाशनंदनजी महाराजगिरी यांचे तर मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी गणेश जयंती निमित्त सकाळी 10 वाजता रामायणाचार्य मनोहर महाराज सिनारे यांचे तर,बुधवार 14 रोजी सकाळी 10 वाजता श्रीकृष्ण कृपांकित भागवताचार्य विकासनंदजी महाराज मिसाळ यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
आपल्या सर्वांचा रक्षणकर्ता, विघ्नहर्ता सुखकर्ता दुखहर्ता लाडका बाप्पा सिद्धिविनायक… श्री गणेशाच्या जयंती उत्सवानिमित्त आपण सर्वांनी सहभागी आपल्यापरीने या सोहळ्यासाठी देणगी रूपाने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.