राहुरी : तालुक्यातील मोकळ ओहळ गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका श्रीमती शितल काळे या सन 2019 पासून सेवेत होत्या. शैक्षणिक दर्जा व ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य त्यांनी 6 वर्षात केले.त्यांची नुकतीच बदली झाली.
गावकऱ्यांनी त्यांची भव्य मिरवणूक काढत, फुलांचा वर्षाव करत निरोप दिला.यावेळी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. ग्रामस्थ व पालकांनी त्यांना अविस्मरणीय असा निरोप दिला, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी बदली झालेल्या शिक्षकांचा नागरी सन्मान केला. तसेच नवीन आलेल्या शिक्षकांचे स्वागत केले, या सहा वर्षाच्या कालावधीत शिक्षकांनी केलेले उल्लेखनीय काम, वार्षिक स्नेहसंमेलन, सहल, विविध स्पर्धा, स्कॉलरशिप मधील विद्यार्थ्यांचे विशेष प्रविण्य इत्यादी कामाचे विशेष कौतुक ग्रामस्थांनी केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानदेव कदम, माजी सरपंच भानुदास कदम, राजेंद्र कदम, सुनील येवले, जयराम औटी, बाबु तोडमल, सचिन कदम,नवनाथ औटी, नितीन औटी,आदिनाथ जाधव, धनंजय महाराज ढोकणे, पोलिस पाटील शांताराम कदम, योगेश घुमे सर, जाधव सर, शिंदे मॅडम, जाधव मॅडम, बोणेकर सर , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,आजी माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा.चेरमन, पालक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













