Home राजकीय आता सोनई परिसरात औषध फवारणीसाठी ड्रोन

आता सोनई परिसरात औषध फवारणीसाठी ड्रोन

21
0
  • सोनई(वार्ताहर)हनुमानवाडी (ता.नेवासा)येथे जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांच्या हस्ते शेतपिकाच्या फवारणी करीता उपयुक्त असलेल्या ड्रोनचे उदघाटन करण्यात आले. येथील शेतकरी संदीप बनकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
  • उपस्थित मान्यवरांचा सत्कार संदीप बनकर,रविंद्र बनकर व परीवाराच्या वतीने करण्यात आला.दत्तात्रेय बनकर यांनी प्रास्ताविक भाषणात बनकर यांच्या शेतीविषयक दूरदृष्टीची माहिती दिली.यावेळी सोनई सेवा सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अप्पासाहेब निमसे,सोमनाथ बंग, बाळासाहेब शेटे,आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले,सचिव संजय गर्जे, नवनाथ शिंदे, अरुण घावटे, अप्पा बनकर उपस्थित होते. प्रशिक्षकांनी ड्रोन उड्डाणचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.
  • गडाख यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागात औषध व वेळेची बचत होवून शेतपीकाचे अधिक उत्पन्न मिळण्यासाठी ड्रोनची औषध फवारणी उपयुक्त ठरेल असे सांगून बनकर परिवारास शुभेच्छा दिल्या. सोनईचे उपसरपंच प्रसाद हरकाळे यांनी आभार मानले.
    ———————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here