Home राजकीय उमेदच्या महिलांचा एकच नारा, आमच्या मागण्या मान्य करा

उमेदच्या महिलांचा एकच नारा, आमच्या मागण्या मान्य करा

23
0

नगर : उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेचे नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार 26 सप्टेंबर रोजी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण सुरू आहे.

शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात यावे. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. भाऊ म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही,उमेद अभियानाचा विजय असो अशा एक घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अक्षरशा दणाणून गेला होता. उमेद संघटनेतील महिला सदस्यांनी यावेळी भाषण करून प्रशासनाचे लक्ष वेधलं.

उपोषणाचे नेतृत्व उमेद महिला व कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा उंडे, सचिव सुरेखा वारे, कोषाध्यक्ष बाबासाहेब सरोदे आदींनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here