Home अहमदनगर पती-पत्नी दोघांनी रामायण कथा श्रवण करावी

पती-पत्नी दोघांनी रामायण कथा श्रवण करावी

2
0
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 32768;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 43;

सोनई – रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक नागपूरकर यांच्या वाणीतुन तुलसी रामायण कथेला सोनई येथील जगदंबा मंदिराच्या पटांगणावरील भव्य मंडपात बुधवारी प्रारंभ झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.

 

प्रसंगी रामराव महाराज ढोक यांनी श्री रामायण ग्रंथ महात्म्य व शिवपार्वती विवाह या विषयावर कथा प्रवचन करताना सांगितले कि रामायणात जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, येथे बंधू प्रेमाचा आदर्श पाहायला मिळतो, तुलसी रामायण आणि राम चरित्र मानस हे धर्मग्रंथ भारतीय संस्कृतीचे प्रतीके असुन शरीरातील दुःखाचा नाश करणारी ही कथा असल्याचे ढोक महाराजांनी सांगितले. तारकासुर राक्षसाचा वध भगवान शंकराच्या मुलाकडून होणार असल्याने देवतांनी भगवान शंकराला लग्नासाठी गळ घातली पार्वतीचे वडील हिमालय यांना नारदाने शंकर पार्वतीच्या पुनर्जन्माचा इतिहास सांगून लग्नास होकार मिळवला असल्याचे सांगितले.

राम कथा चालू असताना मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने ढोक महाराजांना पुष्पहार घातला राम रहीम एकच असल्याचे सांगितले. सोनईचे श्रोते हे सोन्यासारखे असून येथे जमलेली गर्दी नसून हे दर्दी भाविक असल्याचे सांगितले.

पती-पत्नी हे संसार रुपी गाड्याचे दोन चाके असून त्यांनी पत्नीच्या वेगवेगळ्या भूमिका सांगत संकट काळात पत्नीच हिंमत देते, पत्नी दासी बनवून राहते व वेळप्रसंगी पत्नी पतीची माता ही बनत असल्याचे सांगत रामायण कथाही पती-पत्नी दोघांनी मिळून ऐकावी असे सांगितले. सापाला काळ म्हणतात काळाला गळ्यात घालून फिरतो तो महादेव, काळावर जो नाचतो तो श्रीकृष्ण व काळावर जो झोपतो तो श्रीविष्णू असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीराम, सीतामाई तसेच श्री हनुमान प्रतिमेचे पूजन, ग्रंथ पूजन आणि राम कथा संकल्प करण्यात येऊन ग्रंथ पूजन करून श्री गणेश वंदना, करण्यात आली. ह भ प विश्वास मामा गडाख व जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील गडाख यांनी ढोक महाराज व त्यांचे सहकाऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व आलेल्या भाविकांचे आभार व कथेनंतर महाप्रसाद घेण्याचे आवाहन युवा नेते उदयन गडाख यांनी केले. याप्रसंगी मुख्य गायक काशिनाथ महाराज पाटील (जळगाव ), सहगायक संतोष महाराज संबरे (छ.संभाजीनगर) व तबलावादक अश्विनी कुमार भकने ( छिंदवाडा, मध्य प्रदेश ) यांनी साथसंगत केली. शेवटी ११ जोडप्यांच्या हस्ते सामुदायिक आरती करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here