गणराज्य न्यूज ब्राम्हणी
आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राम्हणी व भाग शाळा उंबरे दोन्ही शाळेचा मिळून यावर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल 99.47 टक्के इतका लागला असून भूषण भाऊसाहेब हापसे या विद्यार्थ्यांने 96 टक्के इतके गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.

आतापर्यंत प्रथम क्रमांकाच्या यापूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड मोडून एक नव रेकॉर्ड भूषण हापसे याने तयार केले आहे. सर्वाधिक गुण मिळून ऐतिहासिक यश संपादन केले.तर,राणी बापूसाहेब औटी हिने 94.80 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला तसेच आदित्य नाना बारवेकर हिने 94.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

ब्राह्मणी व भाग शाळा उंबरे मिळून एकूण 192 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 192 विद्यार्थी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाले.
गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य एम.एन बोंबले, प्रभारी पर्यवेक्षक कैलास ढोके, वर्गशिक्षक अशोक हुलूळे,विष्णुपंत कल्हापुरे व विविध विषयाचे शिक्षक एस व्ही शिंदे, व्ही ए बिबवे, ए एस दुधे , एस एन राठोड, एस पी तुपे, यु एस घुगरकर, प्रवीण मोकासे व देवरे मॅडम आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचे ब्राह्मणी उंबरे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.













