Home महाराष्ट्र मानोरीच्या वैभवात भर…!!

मानोरीच्या वैभवात भर…!!

2
0

गणराज्य न्यूज

मानोरी 

राहुरी तालुक्यातील मानोरीसह परिसरातील विविध गावांच्या आरोग्य सेवेसाठी प्रशस्त व सर्व सुविधायुक्त सिंधू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ बुधवार 6 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज व गुरुवर्य महंत स्वामी श्री प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते होत आहे.

स्वर्गीय सिंधुबाई कचरू आढाव यांची पुण्याई व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कचरू तुकाराम आढाव (नाना) यांच्या आशीर्वादाने आम्ही आपल्यासाठी वैद्यकीय सेवेत येत आहोत.नव्याने सुरू होत असलेल्या सिंधू आरोग्य मंदिराच्या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपले शुभेच्छारुपी आशीर्वाद महत्वाचे ठरणार आहेत.तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.अजिंक्य पोपटराव आढाव व परिवाराकडून करण्यात येत आहे.

सिंधू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व प्रसूतीगृह या भव्य दिव्य दिव्य वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यासाठी धार्मिक,राजकीय सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
मानोरी गावच्या वैभवात भर पाडणाऱ्या सिंधू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चोवीस बाय सात विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध असणार आहे.

यामध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर व प्रसूतीगृह, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी सुविधा, डिजिटल एक्स-रे सुविधा तसेच तज्ञ अनुभवी डॉक्टरांच्या हॉस्पिटलला भेटी असणार आहेत.त्यामुळे आता बाहेर जाण्याची गरज पडणार नाही.परिणामी रुग्ण व नातेवाईकांचा वेळ वाचणार असून आर्थिक फायदा होणार आहे. सिंधू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची वैद्यकीय टीम कायम आपल्या सेवेत असणार आहे. तरी आपण उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित रहावे.असे आवाहन संचालक डॉ.अजिंक्य आढाव, स्री रोग तज्ञ डॉ.रूपाली अजिंक्य आढाव, स्री रोग तज्ञ डॉ.प्रवीण जाधव, डॉ.अमृता जाधव, डॉ. प्रवीण क्षीरसागर,श्री.अभिजीत कोहकडे,भूषण आढाव व किरण आढाव यांच्याकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here