गणराज्य न्यूज ब्राह्मणी – महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून अनेक वर्षापासून प्रलंबित व कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या ब्राह्मणी- पिंपरी वळण-वांबोरी या रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी 36 लाख रुपये मंजूर त्याच प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे.
आज शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता सदर रस्त्याच्या कामाचा उद्घाटन सोहळा होत आहे.तरी आपण मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन वांबोरी,ब्राह्मणी,पिंपरी वळण- ग्रामपंचायत सहकारी सोसायटी, आजी-माजी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात येत आहे.
या रस्त्याच्या आजूबाजूला सर्वाधिक शेतकरी आहेत. 50 वर्षापासून कायम चर्चेत राहिलेल्या रस्त्याची उद्घाटन होत असताना रस्त्याने प्रवास करणारे सर्व स्थानिक शेतकरी यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे परिसरात सर्वाधिक रुंदीचा एकमेव रस्ता म्हणून ओळख निर्माण होणार हे विशेष…. रस्त्यासाठी अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न केला होता.अखेर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्न आतून त्याला यश मिळाले.
पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक अडचणीचा रस्ता सुखकर होत असल्याने शेतकरी ग्रामस्थांकडून आमदार तनपुरे यांचे आभार मानले जात आहे.
प्रतिक्रिया – डॉ.बानकर (पदाधिकारी- शरदचंद्र पवार राष्ट्रवादी) : पाच वर्षाच्या कार्यकाळात
ब्राह्मणी गाव व परिसरात विविध महत्वाच्या रस्त्यांची कामे झाली.यामध्ये केंदळ रस्ता,ब्राम्हणी बाजार तळ ते देवी मंदिर रस्ता, मांगोबा रस्ता, बानकरवाडी वस्ती रस्ता, बहिरोबा रोड,घेरूमाळ वस्ती रस्ता,नागझरी रस्ता आदींसह अनेक लहान मोठे रस्त्याचे कामे,याशिवाय नवीन 9 विद्युत रोहित्र, शेकडो विद्युत रोहित्र दुरुस्ती, जीम साहित्य आदी अनेक कामे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. अनेक कामे प्रस्तावित आहेत…असे माहिती डॉ. राजेंद्र बानकर यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.