राहुरी – तालुक्यातील काही गावासाठी गत महिन्यात तालुका पुरवठा गावाकडून पाठविण्यात आलेल्या रेशनच्या धान्यात प्रत्येक गोणी मागे एक दोन किलो धान्य कमी आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सर्व रेशन कार्डधारकांना उद्दिष्ट प्रमाण धान्य वितरण करण्याची जबाबदारी धान्य वितरक केंद्र चालकांची असते.धान्य कमी पडले.तर, राहिलेल्या ग्राहकांना वाटायचं काय? असा प्रश्न पडतो.आता लोकांची आरडा ओरड होत आहे. याबाबत संबंधित तालुका पुरवठा विभागाची धान्य वितरणाची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार माहिती दिली.पण त्यांनी अद्याप दुर्लक्ष केलं असल्याचे दिसून येते. राहिलेल्या रेशन कार्डधारकांना धान्य कोणी वाटायचं कुठून आणायचं असा प्रश्न केंद्र चालकांना पडला आहे. तालुक्याकडून आलेले धान्य नेमकं गेलं कुठं मग? असा सवाल उपस्थित केला जातोय. राहुरी तहसीलदार यांनी याबाबतीत गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी रेशन कार्डधारकांकडून होत आहे.
नियमित प्रमाणे या महिन्याचा पुरवठा झाला.पण तांदूळ व गव्हाच्या प्रत्येक गोणी मागे एक ते दोन किलो माल कमी आला याबात संबंधित सक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांना आम्ही कळवले. मात्र,अद्याप आम्हास प्रतिसाद नाही. अशी प्रतिक्रिया धान्य पुरवठा वितरण करणाऱ्या केंद्र चालकांची आहे.