अहिल्यानगर : श्री क्षेत्र ब्राम्हणी येथे आदिशक्ती जगदंबा देवी मंदिर दरबारात हिंदू समाजाची अस्मिता प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे रविवार ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता होम – हवन व पूजा होईल.शनिवार सायंकाळी 3 ते 6 यावेळेत श्रीराम मूर्ती मिरवणूक सोहळा व रविवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.दरम्यान हभप कानिफनाथ महाराज जाधव यांचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार तरी आपण सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यात सहभागी व्हाव.असे आवाहन सकल हिंदू समाज व ग्रामस्थ ब्राह्मणी यांच्याकडून करण्यात येत आहे.













