Home महाराष्ट्र पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारी

पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारी

36
0

पंढरपूर गणराज्य वेब टीम :-
युवा चेतना फाऊंडेशन, पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्था, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पाचशे युवकांनी तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे स्वच्छता अभियान राबवून पांडुरंगाच्या चरणी स्वच्छता वारीची सेवा अर्पण केली.या विशेष उपक्रमाचे जिल्ह्यातून स्वागत होत आहे.

युवा चेतना फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमर कळमकर आर्ट ऑफ लिव्हिंगचे अॅड सुनिल गडाख, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख व आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांच्या नियोजनात पंढरपूर येथील ६५ एकर मधील भक्तीसागर परीसर,चंद्रभागा नदीच्या काठ, प्रदक्षिणा मार्ग व शिवाजी चौक परीसरात युवकांनी स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये कागद, प्लॅस्टिक, चप्पल,बूट, शिल्लक टाकलेले अन्न, नदीत सोडलेले कपडे आदी कचरा उचलण्यात आला.

संत कवी महिपती महाराज मठात महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या उपस्थितीत अभियानाची सुरुवात करण्यात आली. अमर कळमकर व अॅड सुनिल गडाख यांनी आवश्यक सुचना दिल्या.यावेळी आनंदवनचे सचिव संजय गर्जे,विठ्ठल महाराज खाडे,किशोर घावटे,डाॅ.तुषार दराडे,अनिल वाघ,निवेदक संघटनेचे उपाध्यक्ष पत्रकार गणेश हापसे आदी उपस्थित होते. शनैश्वर मठात यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या उपस्थितीत अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सोनईचे सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हारकाळे, आनंदवनचे अध्यक्ष उदय पालवे, राजेंद्र गुगळे उपस्थित होते.

अहंकार बाजुला ठेवुन स्वच्छता अभियान करावे लागत असल्याने ख-या अर्थाने सेवाभाव प्रज्वलित झाला.भविष्यात स्वच्छता वारीला पर्यावरणाची जोड देऊन प्रबोधन व वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करणार आहे.
असल्याचे आर्ट ऑफ अॅड लिव्हिंगचे सुनिल गडाख यांनी जाहीर केले.

जेष्ठ नेते यशवंतराव गडाख, आमदार शंकरराव गडाख व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांचा नेहमीच सामाजिक कार्याला पाठिंबा असतो. प्रतिष्ठानचे एकशे सत्तर युवक अभियानात सहभागी झाले असल्याचे यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी सांगितले.

आनंदवन सेवाभावी संस्था वर्षभर
धार्मिक,सामाजिक,आरोग्य,
पर्यावरण तसेच शैक्षणिक उपक्रम राबवित आलेले आहे. वारक-यांची सेवा व आरोग्यविषयक उपक्रम म्हणून स्वच्छता अभियानाने मनोमन समाधान वाटले.असे मत
आनंदवन सेवाभावी संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here