Home महाराष्ट्र बानकर स्कूलचा 100 टक्के निकाल

बानकर स्कूलचा 100 टक्के निकाल

2
0

ब्राम्हणी गणराज्य न्यूज

निकालाची उज्वल परंपरा राखण्यात स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूल यश आले असून इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक गुण मिळवत आपल्या मेहनतीची चमक दाखवून दिली. तसेच 75 % पेक्षा अधिक गुण मिळवत ३३ विद्यार्थी तर,60 % पेक्षा अधिक गुणांसह 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जयश्री खंडागळे हिने 93.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर,समृद्धी मोरे हिने 92.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.तर,वेदिका पानसरे हिने — 92.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर व प्राचार्य सौ. अश्विनी बानकर, सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पालकांचा विश्वास व विद्यार्थी , शिक्षकांचे परिश्रम यामुळे वर्षभरात विविध उपक्रमासह अभ्यासक्रम पूर्ण करत गुणवत्तेची परंपरा कायम राखून ब्राम्हणीसह परिसरातील गावातील शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांचा विश्वास संपादन करण्यात विलास बानकर इग्लिश मिडीयम स्कूलने यश मिळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here