Home महाराष्ट्र निधन वार्ता

निधन वार्ता

2
0

ब्राम्हणी : ग्रामपंचायतचे माजी सदस्य व प्रगतशील शेतकरी बाळासाहेब (काका) मच्छिंद्र तारडे ( वय ५५) यांचे मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान पुणे येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.

 

त्यांचा अंत्यविधी आज रविवार 10 मे रोजी सकाळी 9.30 वाजता ब्राम्हणीत देवीचे तळे येथील स्मशानभूमीत होईल.

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,भाऊ, भावजई,पुतणे असा परिवार आहे.भाऊसाहेब मच्छिंद्र तारडे यांचे ते थोरले बंधू होते.

रामचंद्र (अण्णा) धामणे व मच्छिंद्र शेटे यांचे ते मेव्हणे होत.मुकुल तारडे यांचे वडील तर ॲड. व्यंकटेश भाऊसाहेब तारडे यांची चुलते होत.कृषी उद्योजक ॲड.कृष्णा धामणे यांचे ते मामा होत.

ब्राम्हणीत अनेक वर्ष त्रिमूर्ती थिएटर (चित्रपटगृह) चालविले.ब्राम्हणी ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून काम पाहिले.काका या नावाने त्यांची ओळख राहिली.प्रगत व अत्याधुनिक शेती केली.

बाळासाहेब (काका) तारडे यांच्या निधनाने ब्राम्हणी परिसरात शोककळा पसरली असून अनेकांकडून आता त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here