Home महाराष्ट्र शेतकरी कर्ज माफी:अमान्य

शेतकरी कर्ज माफी:अमान्य

40
0

Ganrajya news ब्राह्मणी: राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली शेतकरी कर्ज माफी आम्हास मान्य नसून या निषेधार्थ उद्या शुक्रवारी सकाळी कर्जमाफी अध्यादेशाची होळी करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय रामदास मोकाटे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.

शेतकरी संघटनेचे नेते ॲड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमाफी अध्यादेश होळी करण्यात येणार आहे.तरी कर्जमाफीच्या जाचक अटी दूर करून ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी बांधवांनी सरकार दरबारी आपली ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटना ब्राम्हणी शाखेच्या वतीने संजय रामदास मोकाटे,राजेंद्र चंद्रभान राजदेव,तुळशीराम तारडे,विश्वनाथ हापसे,बापूसाहेब तारडे, सोमाकांत कचरू राजदेव,बाबासाहेब एकनाथ मोकाटे,पोपटराव मोकाटे,बाळासाहेब भाऊसाहेब जाधव,अमोल बाबासाहेब मोकाटे,सकाहरी कचरू गायकवाड, दीपक गंगाधर पठारे,जालिंदर ज्ञानदेव राजदेव,संजय विठ्ठल गायकवाड,संजय जालिंदर हापसे व अन्य संघटनेच्या सदस्यांकडून आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here