
ब्राम्हणी – राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्ज माफी अध्यादेशाची ब्राम्हणीतील शेतकऱ्यांनी शुक्रवार ५ मे रोजी सकाळी होळी करण्यात आली…
कर्जमाफी आम्हास मान्य नसून सरकारने कर्ज माफीचा निर्णय घेताना बहुतांश शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे नेते ॲड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमाफी अध्यादेश होळी करत राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.यावेळी रविंद्र हापसे सर,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय मोकाटे,विश्वनाथ हापसे सर आदींनी मनोगत व्यक्त करून सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध केला.यावेळी शेतकरी संघटना ब्राम्हणी शाखेचे अध्यक्ष संजय मोकाटे,राजेंद्र राजदेव,भानूआप्पा मोकाटे,सतिष तारडे,तुळशीराम तारडे,विश्वनाथ हापसे,बापूसाहेब तारडे, संभाजी हापसे सोमाकांत कचरू राजदेव,बाबासाहेब मोकाटे,,बाळासाहेब जाधव,अमोल मोकाटे, कृष्णा राजदेव,सकाहरी कचरू गायकवाड, दीपक पटारे,जालिंदर राजदेव,संजय गायकवाड,संजय हापसे आदी उपस्थित होते.
अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सुरू असलेल्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक करण्यात आले.सरकारने तुकाराम मुंडे यांची काही काळासाठी साखर आयुक्तपदी नियुक्ती करावी..अशी मागणी करण्यात येवून चांगल्या कामाबद्दल तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करण्यात आला.












