Home महाराष्ट्र हॉटेल साम्राज्यचा आज भव्य शुभारंभ

हॉटेल साम्राज्यचा आज भव्य शुभारंभ

2
0

‘हॉटेल साम्राज्य’ या नवीन व्हेज आणि नॉन-व्हेज रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ आज मंगळवार 14 जुलै रोजी सायंकाळी 6 नेवासा तालुक्यातील सोनई-खेडले परमानंद रोड शिरेगाव फाटा येथे होत असल्याची माहिती ऋत्विक रंगनाथ होन यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.

हॉटेल साम्राज्यच्या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनीलभाऊ गडाख, शिवसेना नेते विक्रम राठोड,राष्ट्रीय श्रम संघाचे सागर भैय्या बेग, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, धर्मवीर संभाजी राजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे पाटील, हिंदू धर्म रक्षक संतोष भाऊ ब्राह्मणे,हिंदूधर्म रक्षक पैलवान संदीप लांडे आदी मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आम्हा बंधूंना पुढील हॉटेल व्यवसाय क्षेत्रातील वाटचालीस आशीर्वाद रुपीशुभेच्छा द्याव्यात असे आवाहन ऋत्विक रंगनाथ होन यांनी केले आहे.

अस्सल शाकाहारी आणि मांसाहारी खवय्यांसाठी एकाच छताखाली रुचकर जेवणाचा आनंद देणारे हे एक उत्तम ठिकाण ठरणार आहे.रुचकर व्हेज आणि नॉन-व्हेज थाळी, बिर्याणी आणि तंदूरचे विविध प्रकार. कुटुंब आणि मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी उत्तम व आकर्षक बैठक व्यवस्था असल्याचे ऋत्विक होन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here