Home Blog पालखी सोहळ्यात दुःखत घटना

पालखी सोहळ्यात दुःखत घटना

2
0

गणराज्य न्यूज पुणे …

आषाढी वारीदरम्यान सोमवारी (१३ जुलै) सकाळी सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या महिला वारकरी पायी चालत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना चिरडल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. 

या घटनेमुळे पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली असून वारकरी संप्रदायातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

हा अपघात सासवड-जेजुरी रस्त्यावर बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या शिवदीप (साईदीप) लॉजिंगसमोर घडला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिला या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावच्या रहिवासी असून त्यांची नावे राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार अशी आहेत.

अपघातात जखमी झालेल्या चार महिलांवर जेजुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

संबंधित ट्रक हा नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीचा असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या सुमारे ७० वर्षीय ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

आषाढी वारीसारख्या पवित्र सोहळ्यात घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे वारकरी भाविकांमध्ये शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही या घटनेनंतर जोर धरू लागली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस केली.

मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत करण्याचे घोषणा करण्यात आली असून जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

यावेळी त्यांच्या समवेत जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप बाराभाई, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, विक्रम राजपूत तहसीलदार, हे देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here