Home महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

2
0

अहिल्यानगर / गणराज्य न्यूज 
जिल्हा  पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.

स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची बदली शिर्डी साई मंदिर सुरक्षा शिर्डी येथे करण्यात आली. याशिवाय नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील बदलण्यात आले आहेत.

एलसीबी चा कारभार तात्पुरत्या स्वरूपात सपोनी हरीश भोये यांच्याकडे देण्यात आला आहे.

बदली करण्यात आलेले अन्य अधिकारी व त्यांची नियुक्ती पुढीलप्रमाणे..
पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ तोफखाना ते नियंत्रण कक्ष.
रवींद्र देशमुख नियंत्रण कक्ष ते राहुरी पोलीस ठाणे. विलास पुजारी पाथर्डी पोलीस ठाणे ते मानव संसाधन विभाग. संभाजी गायकवाड कोतवाली पोलीस ठाणे ते द वी प अहिल्यानगर. किरण शिंदे श्रीगोंदा पोलीस ठाणे ते ए एच टी यु अहिल्यानगर. संजय ठेंगे राहुरी पोलीस ठाणे ते श्रीगोंदा पोलीस ठाणे, नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे ते कोतवाली पोलीस ठाणे, आनंद कोकरे मानव संसाधन विभाग ते पाथर्डी पोलीस ठाणे, प्रताप दराडे नियंत्रण कक्षेते नेवासा पोलीस ठाणे, बाबासाहेब बोरसे शहर वाहतूक शाखा ते घारगाव पोलीस ठाणे, महेश पाटील नियंत्रण कक्ष ते शहर वाहतूक शाखा, दीपक सरोदे नियंत्रण कक्ष ते राहता पोलीस ठाणे, बालाजी वैद्य ए एच टी यु ते तोफखाना पोलीस ठाणे, हनुमान गायकवाड नियंत्रण कक्ष ते कर्जत पोलीस ठाणे, सपोनी युवराज आठरे आर्थिक गुन्हे शाखा ते लोणी पोलीस ठाणे.

सपोनी माणिक चौधरी एमआयडीसी पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा, जगदीश मुलगीर भिंगार कॅम्प ते आर्थिक गुन्हे शाखा, तेजश्री थोरात कोतवाली पोलीस ठाणे ते भिंगार कॅम्प पोलीस ठाणे, हेमंत थोरात घारगाव पोलीस ठाणे ते एमआयडीसी पोलीस ठाणे.
बदल्यांच्या आदेशामध्ये नमूद केल्यानुसार बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या ठिकाणी पदभार घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here