गणराज्य न्यूज नेवासा — युवराज उद्योगसमूह संचलित हॉटेल युवराज परमिट रूम बार अँड लॉजिंगचा भव्य उद्घाटन शुभारंभ सोहळा शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता खासदार निलेशजी लंके यांच्या हस्ते होत असल्याची माहिती युवराज उद्योगसमूहाचे प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेवासा तालुका अध्यक्ष सतिष पांडुरंग थोरात यांनी दिली आहे.
याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे,माजी मंत्री शंकरराव गडाख,आमदार विठ्ठलराव लंघे,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर काका शिंदे, एबी कंपनीचे सर्वेसर्वा अविनाश बानकर,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप वर्पे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ देसरर्डा,साजिद भाई पठाण आदी प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शिंगवे तुकाई एमआयडीसी समोर हॉटेल युवराज आता आपणा सर्वांच्या सेवेत असणार आहे.हॉटेल क्षेत्राच्या माध्यमातून नवीन उद्योग व्यवसायात आम्ही वाटचाल करत आहोत.आपल्या शुभेच्छा व सदिच्छा या आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत.तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील व नेवासा तालुक्यातील सर्व मित्र परिवार,नातेवाईक हितचिंतक व तुकाई शिंगवे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन युवराज उद्योगसमूहाचे प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेवासा तालुका अध्यक्ष सतिष पांडुरंग थोरात यांनी गणराज्य न्यूजच्या माध्यमातून केले आहे.
















