Home महाराष्ट्र चेडगावामध्ये बिबट्याची दहशत

चेडगावामध्ये बिबट्याची दहशत

21
0

 

  1. राहुरी तालुक्यातील चेडगावामध्ये काल गुरुवारपासून बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे.एक नव्हे एकाच वेळी तीन तीन बिबटे एकाच वेळी पहायला मिळाल्याने परिसरात शेतकरी वर्ग घाबरलेला आहे.

  1. आज बापूसाहेब सदाशिव ताके रात्री 8.30 वाजेच्या दरम्यान दूध घालून आपल्या घराकडे जात असताना मुळा उजवा कॅनॉललगत त्यांच्यावर हल्ला करण्याचा बिबट्याचा प्रयत्न फसला.
    लागलीच 15 मिनिटांनी संजय भोरूनाथ जाधव हे पत्नीसह ब्राम्हणीहून घरी जात असताना मुळा उजवा कॅनॉल त्याच परिसरात त्यांच्यावर झडप टाकण्याचा प्रयत्न झाला.सुदैवाने ते वाचले. पुन्हा काही वेळात सतिश भारत तरवडे यांना बिबट्याचे दर्शन झाले.अवघ्या अर्ध्या तासात तीन ठिकाणी बिबट्याने दहशत केली.
  2. गुरुवारी रात्री 8.30 वाजता नवनाथ भागवत नवले हे आपल्या मेंढ्याकडे मुक्कामाच्या ठिकाणी वंजारवाडी परिसरात पाटाने डोळे वस्तीकडे जात असताना त्यांच्या दुचाकी गाडीवर झडप मारली.गाडीचे सीट फाटले. दूर पर्यंत पाठलाग केल्याचे समजते.गुरुवारी रात्री ताके वस्तीवर 3 बिबटे पाहिले असल्याचे राहुल ताके यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना सांगितले.त्यानुसार वनविभागाचे कर्मचारी आज गावात आले होते. ग्रामस्थांशी बोलले. पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली. सलग दोन दिवसापासून बिबट्याची मोठ्या प्रमाणात भीती आहे.त्यानुसार ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून योग्य ती कार्यवाही करावी… अन्यथा लोकांच्या जीविताला धोका आहे.हे निश्चित…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here