गणेश हापसे गणराज्य न्यूज
राहाता – तालुक्यातील अस्तगाव परिसरातील गोल्हारवाडी येथे २१ ऑगस्ट पासून हरिनाम सप्ताह प्रारंभ होत आहे.
२१ ते २८ दरम्यान सप्ताह काळात ज्ञानेश्वरी पारायण काकडा,भजन, हरिपाठ, कीर्तन, भारुड आदि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पारायण व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प चैतन्य महाराज माघारे, गायनाचार्य म्हणून विकास महाराज हापसे, स्वातीताई महाराज हापसे, चैतन्य महाराज कोबरणे तर, मृदुंगाचार्य नकुल महाराज कल्हापुरे सात दिवस कीर्तनकार मंडळींना साथ संगत करणार आहेत.

सप्ताह काळात दररोज सायंकाळी नामांकित महाराज मंडळींची कीर्तन होणार आहे. यामध्ये ह.भ.प अर्जुन महाराज चौधरी, ह.भ.प विकास महाराज हापसे, शिवशाहीर शरद महाराज ढवळे, ह.भ.प स्वातीताई महाराज हापसे, भागवताचार्य दिगंबर महाराज किरकाडे, ह.भ.प अमोल महाराज बडाख, हभ.प बाळकृष्ण महाराज पारखे, ह.भ.प अश्विनीताई तांबे आदींची कीर्तने होणार आहेत. तर २८ रोजी ह.भ.प स्वामी सुदाम महाराज कातकाडे यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. दरवर्षी तरुण वारकरी सप्ताह उत्कृष्ट आयोजन करत असतात.आदर्श कीर्तन महोत्सव म्हणून या सोहळ्याकडे परिसरात पाहिले जाते. यंदाही आध्यात्मिक कार्य यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे.














