गणराज्य न्यूज अहिल्यानगर : जिल्ह्यासह राज्यभर बिबट्यांचे वाढते हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे.परिसरात उसाचे क्षेत्र अधिक आहे. बिबट्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा असल्याने रात्री शेतात काम करणे शेतकऱ्यांसाठी धोक्याच ठरत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांवर विविध ठिकाणी हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.आपल्या परिसरात अशा घटना टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी उद्या शनिवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वा.,महावितरण कार्यालय, वांबोरी येथे दिवसा वीजपुरवठा मिळावा या अत्यंत महत्त्वाच्या मागणीसाठी सर्वांनी एकत्र येऊन निवेदन देवूया ….

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वांबोरीतील शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.















