Home अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत जाधव

जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत जाधव

115
0

राहुरी — महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया विभागाच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत जगन्नाथ जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सांगली येथे डिजिटल मीडिया अधिवेशन पार पडले.प्रसंगी डिजिटल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडल्या. यावेळी राहुरी येथील युवा पत्रकार श्रीकांत जाधव यांची अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या प्रसंगी शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आ.गोपीचंद पडळकर, अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे, राज्य संघटक संजय भोकरे प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, पत्रकार संघाचे प्रवक्ते रमेश डोंगरे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, शहर जिल्हाध्यक्ष गणेश अंबिलवादे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here