
राहुरी – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ब्राह्मणी गावात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती ब्राह्मणी यांच्या वतीने ब्राम्हणी बस स्टॅन्ड येथे दिवसभर सरबत वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावरून जाणारे वाटसरू व स्थानिक नागरिकांना कडक उन्हात चांगला दिलासा मिळाला.
सदर उपक्रम राबविण्यासाठी प्रकाश साठे,राजूभाऊ साठे, सचिन साठे, मंगेश साठे, सुहास साठे, रमेश साठे, रवी साठे, प्रवीण साठे, सुशांत साठे, सत्यवान साठे, अमोल चंद्रकांत साठे, रमेश चंद्रकांत साठे, रवींद्र बाबुराव साठे, सुहास रवींद्र साठे दाविद बारकू साठे, रितेश साठे, विलास सुरेश साठे, सुनील एकनाथ साठे,गोरख साठे, भाऊसाहेब साठे, बबलू शिरसाठ यांनी सहकार्य करत विशेष परिश्रम घेतले.















