सोनई- अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी पती राज कुंद्रा यांच्यासह शनिशिंगणापूरात शनी दर्शन घेतले.यावेळी त्यांच्या समवेत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि निर्माता पती राज कुंद्रा सह शनी शिंगणापूर येथे कुटुंबासह शनी दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांच्या समवेत कुटुंबातील इतर सदस्य पण उपस्थित होते.शनिशिंगणापूर येथे त्यांनी अभिषेक करून शनी चौथर्यावर शनिदेवाला तेल अर्पण केले. यावेळी बोलताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणाल्या, मी दर वर्षी शनिशिंगणापूरला येऊन शनी देवाचे दर्शन घेते.शनी दर्शनने माझ्या मनाला समाधान वाटते. यावेळी शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्थ दिपक दादासाहेब दरंदले यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे शनीशिंगणापूर देवस्थानच्या वतीने स्वागत करून सत्कार केला.यावेळी विश्वस्थ दिपक दादासाहेब दरंदले यांनी शनिशिंगणापूर सुरु असलेल्या विकासकामा विषयी माहिती दिली.यावेळी शिल्पा शेट्टी यांना पाहण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणावर जमले होते.यावेळी पुजारी अशोकदेवा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली पौरोहित्य झाले.













