राहुरी (गणराज्य न्यूज) – राज्यातील कदाचित एकमेव शाळा असेल ज्या शाळेची शंभरी साजरी होते ही निश्चित समाधानाची बाब आहे. आपण देखील जि.प.शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो. आज पट संख्या कमी असली तरी हेच विद्यार्थी उद्या तांदुळवाडी गावाचे नाव नक्कीच पुढे नेतील. शाळेबाबत ग्रामस्थांनी दाखविलेला आदर इतरांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास तहसिलदार नामदेव पाटील यांनी व्यक्त केला.
राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे जि.प.शाळा शताब्दी वर्ष गुणगौरव सोहळा तसेच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक व वृत्तसंपादक विकास अंत्रे होते. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, केंद्रप्रमुख सौ.सरस्वती खराडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पत्रकार विनीत धसाळ, बाळासाहेब पेरणे, शरदराव पेरणे, प्रभाकर म्हसे, भास्कर पेरणे, पोलिस निरीक्षक विशाल खैरे आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले की आपण जीप शाळेचा विद्यार्थी असल्याचा आजही अभिमान वाटतो. गुणवत्ता आणि वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण मिळते. शाळेचा पट कमी व वर्ग जास्त अशी परिस्थिती असली तरी हेच विद्यार्थी गावाचे नाव पुढे नेतील. गेल्या शंभर वर्षात या शाळेने हजारो विद्यार्थी घडविले कदाचित ही राज्यातील पहिली शाळा असेल ज्याची शताब्दी साजरी होते ही निश्चित अभिमानाची गोष्ट आहे.
यावेळी विकास अंत्रे म्हणाले की, समाजाने शिक्षकाचा सन्मान करायला शिकले तर राष्ट्र व देश घडेल. समाजाची शिक्षकाप्रती असलेली मानसिकता बदलली पाहिजे. शिक्षक योग्यच काम करत असतात. सोशल मीडिया व बदलत्या जीवन शैलीमुळे समाजात बदल झालेले आहेत. अंधार खूप झाला आहे पण एक चांगल्या विचारांचा दिवा पेटला तर एक कोपरा तरी उजळू शकतो असा विचार करण्याची गरज आहे. जि.प.शाळेची शताब्दी असा कार्यक्रम आपण पाहिला नाही. याचबरोबर माजी विद्यार्थ्यांचा सन्मान होणे ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ यांनी प्रास्तविक करताना या कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. ज्या शाळेने गावातील शेकडो विद्यार्थी घडविले त्या शाळेच्या बाबतीत सर्वांना आदर आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे आवश्यक होते असे सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, बाळासाहेब पेरणे शरद पेरणे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक, आजी-माजी सैनिक, आजी-माजी शिक्षक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी विठ्ठल खडके, नारायण पेरणे, बाळासाहेब धसाळ, तुकाराम हंडाळ, नामदेव निमसे, दादासाहेब पेरणे, रेवन्नाथ पेरणे, मोहन खाटेकर, रंगनाथ पेरणे, मच्छिंद्र चव्हाण, रामराव पेरणे, कानिफनाथ धसाळ, सुखदेव खाटेकर, मच्छिंद्र पेरणे, जेष्ठ पत्रकार निसार सय्यद, उपसरपंच ज्ञानेश्वर खिलारे शिवाजी खडके, नरहरी धागुडे, लक्ष्मण पेरणे, रेवन्नाथ खडके, सिताराम पेरणे, संतोष धसाळ, अविनाश पेरणे, हभप महेश महाराज खाटेकर, विक्रम पेरणे, योगेश पेरणे, प्रमोद खडके, कांतीलाल डुक्रे, बबन डुक्रे, बबन कोकाटे, मुख्याध्यापक प्रभुजी बाचकर, शिक्षिका कल्याणी खराडे, तलाठी शरद गिते, ग्रामविकास अधिकारी संजय भिंगारदे, गोरख मोरे, लालखान शेख, अक्षय निकम, भूषण निकम, नितीन निकम, कृष्णा डूक्रे, ओंकार पेरणे, संजय धागुडे, शिवाजी पेरणे, शिवाजी धसाळ, अजय धसाळ, राहुल ससाणे, अमर मोरे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ.स्वप्नाली चव्हाण, सदस्य अश्विनी धसाळ, सौ.शितल ससाणे, रावसाहेब खडके, राहुल साळवे, तात्यासाहेब धागुडे, भास्कर धागूडे, भाऊसाहेब धागुडे, सोमनाथ पेरणे, सोमनाथ डूक्रे, भाऊसाहेब धोत्रे, अमोल धसाळ, विजय धसाळ, भाऊसाहेब धसाळ आदींसह युवक, महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन पत्रकार गणेश हापसे यांनी केले. तर मुख्याध्यापक प्रभूजी बाचकर यांनी आभार मानले.
















