Home Blog संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती बैठक

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती बैठक

11
0

राहुरी : तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार नामदेव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

  • यावेळी एकूण ३२५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
    या बैठकीसाठी एकूण ३९१ प्रकरणे दाखल झाली होती. संजय गांधी योजनेत एकूण २६५ तर श्रावणबाळ योजनेत ६० असे एकूण ३२५ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर १४ प्रकरणे पूर्ततेवर ठेवण्यात आली आहेत तर एकूण ५२ प्रकरणे नामंजूर झाली आहेत. यावेळी नायब तहसीलदार सचिन औटी, सदस्य उत्तमराव खुळे सर, नारायण धनवट, संदीप आढाव, अजित डावखर, संजय गांधी निराधार शाखेचे संजय वाघ, भारत जरे, मंगेश साठे, गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी खळेकर आदी उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे काम सुरू असून आज अखेर एकूण ७ बैठका झाल्या असून एकूण १९४९ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. या बैठकीत प्रकरण मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांनी २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्सवर आधार लिंक असल्याबाबत बँकेचा शिक्का घेऊन तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेत अथवा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या संपर्क कार्यालयात ही कागदपत्रे जमा करावीत. तालुक्यातील गरजू व पात्र लाभार्थ्यांनी लाभ मिळण्यासाठी तहसील कार्यालय, संजय गांधी शाखा, समितीचे सर्व सदस्य यांच्याशी संपर्क साधावा तसेच प्रकरण होण्यासाठी एजंट अथवा त्रयस्थ व्यक्तीकडे पैसे देऊ नये, कोणी पैशाची मागणी केल्यास तक्रार करावी असे आवाहन अध्यक्ष विनित धसाळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here