ब्राम्हणी : विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय म्हणजे मॅजिक शो अर्थात “जादूचे प्रयोग” स्व.विलास बानकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले.
बानकर स्कूलमध्ये गुरुवारी प्रख्यात इंटरनॅशनल जादूगार श्री भागवत कानडे व त्यांची मुलगी रिया यांनी अत्यंत सुंदर जादूचे प्रयोग सादर केले.
प्राचार्य अश्विनी बानकर यांच्या संकल्पनेतून काम शाळेत विविध प्रयोग राबविले जातात.”शाळेमध्ये जादूचे प्रयोग आयोजित करणे, विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करण्याचा आणि त्यांना मनोरंजक पद्धतीने विज्ञान शिकवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जादूचे प्रयोग विद्यार्थ्यांना विज्ञानाचे मूलभूत सिद्धांत सोप्या पद्धतीने शिकण्यास मदत करतात. असे मत व्यक्त करत कलाकारांचा प्राचार्य बानकर यांनी सत्कार केला. यावेळेस शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जादूचेप्रयोगातून विद्यार्थ्यांच मनोरंजन झाल.अनेकांनी प्रयोग पाहून आश्चर्य व्यक्त केलं. कौशल्यपूर्ण आणि गमतीशीर कृत्य. यामध्ये हातचलाखी, दिशाभूल करणे, किंवा काही विशिष्ट वस्तूंचा वापर करणे यांचा समावेश दिसून आला. काही जादूचे प्रयोग साधे आणि सहज करता येण्यासारखे होते. विद्यार्थ्यांनी त्यातून नावीन्यपूर्ण धडे घेतले.













