गणराज्य राहुरी राहुरी : कारखाना बचाव कृती समितीच्या माध्यमातून न्यायालयीन लढा दिला म्हणूनच कारखान्याची निवडणूक लागली आम्ही केलेल्या न्यायालयीन संघर्षाची मतदान आरोपी पावती द्या निश्चित कारखाना सुरू करून कामगारांचे पै न पै देऊन टाकू असा विश्वास कामगारांना अँड. अजित काळे व कृती समितीचे अमृत धुमाळ यांनी व्यक्त केला.
राहुरी फॅक्टरी येथे कामगारांनी आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी आप्पासाहेब ढुस, सुखदेव मुसमाडे तसेच कृती समितीचे सर्व उमेदवार व कामगार बांधव उपस्थित होते.
पुढे बोलताना अँड अजित काळे म्हणाले की, प्रसाद शुगर चालवण्यासाठीच तनपुरे कारखाना हा त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला यांची बिलकुल इच्छा नाही की तनपुरे कारखाना सुरू व्हावा आम्ही केलेल्या न्यायालयीन संघर्षाची आम्हाला मतदान रुपी पावती द्या. कारखाना बचाव कृती समितीने केलेल्या न्यायालयीन लढ्यामुळेच कारखाना निवडणूक लागली नाही तर हा कारखाना विक्रीस गेला असता तनपुरे कारखाना सभासदांनी आमच्या ताब्यात द्या कामगारांचे देणे आम्ही पै न पै देऊन टाकू असा विश्वास देखील अँड. अजित काळे यावेळी यावेळी बोलताना दिला.
















