गणराज्य न्यूज: राहुरी फॅक्टरी – राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणे कारखान्याचा कारभार चालवू असे काही मंडळी सांगत आहे.तुमच्या ताब्यात इतक्या दिवस बाजार समिती असताना काय विकास केला हीच बाजार समिती जर आमच्या ताब्यात असती तर १०० कोटीहून अधिक नफ्यात असती कुठेही जमिन विक्रीस निघाली की, ते लगेच घेण्यास तयार असतात म्हणून राहुरीमधे यांची ओळख म्हणजे “जयकांत शिकरे” म्हणून आहे. असा हल्लाबोल शेतकरी विकास मंडळाचे प्रमुख रामचंद्र शेटे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरेंवर केला आहे.
डॉ.तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक ३१ मे रोजी होत असून या पार्श्वभूमीवर तनपुरे साखर कारखाना कामगारांनी तिन्ही पॅनल प्रमुखांना आज दुपारी कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिरात भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार यांनी दाखल होऊन आपली भूमिका कामगारांपुढे मांडली. यावेळी अँड. भाऊसाहेब पवार, सतिष बोरुडे, नरेंद्र चव्हाण आदिंसह शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार उपस्थित होते.
















