2012 मधील पैठण धरणाचे पाणी बंद करून राहुरी तालुक्यातील डावा कालवा तसेच उजवा कालवा पाणी सोडण्याचे काम आमदार शिवाजीराव कर्डिले,माजी खासदार बापूसाहेब तनपुरे , शिवाजीराव गाढे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.दरम्यान आंदोलकांना अटक झाली. त्यांना आज अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्त केले. यामध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार बापूसाहेब तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, रावसाहेब यादवराव तनपुरे, सिताराम भाऊ ढुस, आसाराम भाऊ ढुस,प्रा.चांगदेव भोंगळ सर, सोन्याबापू जगधने, डॉ. जयंत कुलकर्णी,डॉ. धनंजय मेहेत्रे, रवी मोरे, अण्णासाहेब भास्कर, तानाजीराव धसाळ,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नितीन तनपुरे, सर्जेराव घाडगे सूर्यभान गाडे, प्रवीण लोखंडे, दत्ता जोगदंड, विजय डवले, शहाजी कदम इतर आरोपींची निर्दोष मुक्ताता करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.













