राहुरी : बंद पडलेला डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा शिवधनुष्य मी उचललाय मात्र मला फक्त सभासदांची साथ हवी आहे. जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळी म्हणतात अरुण तनपुरे काय कारखाना कोणीच चालू शकणार नाही पण सभासदांनी माझ्यावर विश्वास दाखवल्यास निश्चित कारखाना मी सुरू करून दाखवील अशी ग्वाही आज राहुरी फॅक्टरी येथे कामगारांनी आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे यांनी हजेरी लावत कामगारांना विश्वास दाखविला आहे.
येत्या ३१मे ला होणाऱ्या डॉ. तनपुरे कारखान्याच्या निवडणूकित कामगारांनी कोणत्या पॅनलला पाठिंबा द्यायचा यासाठी तीनही पॅनलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कामगार युनियन कडून यांच्याकडून आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी बाजार समितीचे सभापती तथा जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे यांनी मेळाव्यास उपस्थित राहून कामगारांना आश्वासित केले आहे.
डॉ. तनपुरे कारखाना सुरू व्हावा ही माझी तन-मन धनाने इच्छा असून यासाठी जिल्हा बँक व तालुक्यातील विविध संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून कारखाना सुरू करणार आहे. जिल्ह्यातील अनेक नेते म्हणतात अरुण तनपुरे काय कारखाना कोणीच चालू शकणार नाही परंतु सभासद बांधवांनी माझ्यावर विश्वास दाखविल्यास मी निश्चित कारखाना पूर्वस्थितीत आणून दाखवील असाही विश्वास यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केला.
बाजार समितीच्या माध्यमातून कारखाना पेट्रोल पंप, सूतगिरणी चालू करण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळात कारखाना देखील मीच सुरू करेल फक्त सभासद कामगारांनी मला साथ द्या असे यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले.
प्रसंगी डॉ.तनपुरे कारखान्याचे कामगार बांधव व जनसेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.













