ब्राम्हणी : दूध उत्पादकांना वेळेत पेमेंट देवून अनेकांचा विश्वास संपादन करत उत्कृष्ट कामगिरीतून अल्पावधीत दूध उत्पादकांच्या पसंतीस ठरलेल्या माऊली दूध संकलन केंद्राचा आज पाचवा वर्धापन दिन…. पशु पालकांच्या सहकार्याने सहाव्या वर्षाकडे आज यशस्वी वाटचाल करत आहे ……..
श्री.विजयराव आप्पासाहेब नवाळे सर्वसामान्य कुटुंबातील कर्तृत्ववान तरुण… घरची परिस्थिती जेमतेम… सुरूवातीपासून परिस्थितीला तोंड देत हाताला मिळेल ते काम केले.मोलमजुरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न केला.अनेक दिवस दूध प्लांटमध्ये काम केले.डेअरीतील सर्वच जबाबदाऱ्या पार पाडल्या. ऑपरेटर म्हणून काम करून प्लांट चालकांचा विश्वास कमवला.भविष्यात आपण स्वतःहा दूध संकलन केंद्र सुरू करू…हे पाहिलेले स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.अन् पाच वर्षापूर्वी दुध संकलन केंद्र सुरू केले.
सुरुवातीला अवघ्या पाच ते सहा दूध उत्पादकांच्या माध्यमातून संकलन केंद्र सुरू केले.आज 50 ते 60 दूध उत्पादक सभासद कायम आहेत. तारखेनुसार पेमेंट, दिवाळीला दूध उत्पादक सभासदांना साखर वाटप, वर्षभर पशुपालक शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होत अडचणीच्या काळात आर्थिक आधार देण्याच काम माऊली दूध संकलन केंद्राकडून सुरू असते. दूध घेण्यापासून ते दुधाचे कॅन गाडीत टाकून ते स्वतः प्लॅट पर्यंत घेवून जाण्याच काम विजय नवाळे स्वत:हा करतात.कामाची लाज न बाळगता प्राप्त परिस्थितीला तोंड देत मागील परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून माऊली दूध संकलन केंद्राची वाटचाल सुरू आहे. नवाळे यांचा शांत,संयमी स्वभाव अन् कायम जनतेच्या संपर्कात आहेत.
दुग्ध व्यवसायासह सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक कार्यात त्यांचे दातृत्व पहायला मिळते.आज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दूध उत्पादकांचे स्वागत करत सन्मान केला. दूध उत्पादकांसाठी अल्पआहाराचं आयोजन करण्यात आलं होत. दूध संकलन केंद्रासमोर आकर्षक रांगोळी काढून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.