गणराज्य न्यूज सोनई : पानसवाडी गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व स्व. दगडू (आण्णा) मारुती जगताप (वय 69) यांचे उद्या बुधवार दि.14 ऑगस्ट रोजी प्रथम पुण्यस्मरण….. त्यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली… त्यांच्या जीवनातील कार्याचा व वाटचालीचा थोडक्यात वृत्तांत…
स्व. दगडू अण्णांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबातील.. लहानपणीच वडील मारुती जगताप यांचे छत्र हरपले.त्यावेळी दगडू आण्णा 14 वर्षाची होते. भावंडांमध्ये दगडू भाऊ सर्वात मोठे. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर आई लक्ष्मीबाई व दगडू भाऊ यांच्यावर मोठी जबाबदारी पडली.
लहानपणापासून कष्टाची जाणीव त्यांना होती. आई लक्ष्मीबाई जगताप यांनी खूप कष्ट केले. माळी चिंचोरे येथील चिधें परिवारातील मिराबाई यांच्याशी दगडू भाऊंचा विवाह झाला.मोल मजुरी,शेतमजूर,पाईपलाईन खोदकाम, ऊस खांदने आदी कामे केली. अनेक वर्ष सोनईतील मुळा सहकारी कारखान्यात चाळीस रुपये प्रमाणे मजुरी केली. घरी वेळ मिळेल तस शेळ्या वळण्याचे काम केल.
तिघा भावंडांनी आपल्या लग्नानंतर प्रत्येकाने आपला प्रपंच नीटनेटका सांभाळत मुलांना शिकवत शेती उद्योगाचे धडे दिले.
तिघा (दगडू, अशोक,भाऊसाहेब)भावांनी अनेक वर्ष एकत्रित शेळ्या वळवल्या. दरम्यान
कोरोना काळात दुर्दैवाने तिघांना लागोपाठ कोरोना झाला.यामध्ये दगडू भाऊंचे दुसऱ्या क्रमांकाचे बंधू अशोक जगताप यांचे दरम्यान निधन झालं. तर, दगडू भाऊ व भाऊसाहेब हे दोघे भाऊ कोरोनातून सावरले. कुटुंबाने त्यांना आधार दिला. कोरोना काळ तिघा भावांसाठी संघर्षाच गेलं.
आई लक्ष्मीबाई,भाऊ अशोक अन् आता परिवारातील जेष्ठ असणारे दगडू आण्णा यांचे निधन झाले. जगताप परिवाराला एकापाठोपाठ अनेक दुःख सहन करावी लागली.
पुढे संघर्ष थांबायला तयार नव्हता.2020 मध्ये दगडू भाऊंना पॅरेलेस झाला. नगर मधील खाजगी हॉस्पिटल,गंगापूर, पुणे पुणतांबा अशा ठिकाणी कुटुंबाने त्यांना उपचारासाठी नेले. कोरोनाच्या संघटनानंतर पॅरलेस मधून त्यांना एकदा दोनदा कुटुंबाकडून वाचवण्याचा प्रयत्न झाला.2021 मध्ये त्यांना तीव्र स्वरूपाचा अटॅक आला. यामध्ये डावा पाय व हात निकामी झाला. हात बरा झाला… त्यातूनही सावरण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा जीवनदान मिळवणाऱ्या दगडू भाऊंना अखेर 2023 मध्ये काळाने गाठले.अन् अखेर जगाचा निरोप घेतला. नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही.असे म्हणतात त्यानुसार.. अनेक वेळा आजारपणावर काहीस यश मिळविणाऱ्या दगडू भाऊंना अखेर मृत्यू पुढे शेवटी हार मानावी लागली.
संतोष व नवनाथ या दोन मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून देत… उर्वरित आयुष्य त्यांनी अध्यात्मिक नातेवाईक नातवंडांना दिलं. अल्प जमीन (एक सव्वा एकर) असताना कष्टाच्या जोरावर त्यांनी मुलांना उद्योग क्षेत्रात उभे केलं.
ट्रॅक्टर ट्रॉली,जेसीबी या माध्यमातून मुलांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक चालना दिली.
संतोष भाऊंनी पानसवाडी परिसरात ट्रॅक्टर ट्रॉली माध्यमांतून काम सुरू ठेवल.तर, नवनाथ जगताप यांनी ब्राह्मणी सोनई परिसरामध्ये अल्पकाळात आपल्या शांत स्वभावामुळे जेसीबी मशीनरी उद्योगाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला. ब्राह्मणी सोनई परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला. त्यातून नकळत त्यांच्या जेसिबिला काम वाढलं.अनेक मित्र जोडले. वडिलांची शिकवण व संस्कार पुढे घेवून जात कायम कष्टाची जाणीव ठेवणाऱ्या संतोष व नवनाथ या बंधूंनी आपल्या वडिलांची संघर्षाची प्रेरणा कायम डोळ्यासमोर ठेवली.
आई मीराबाई यांच्या मार्शनाखाली दोन्ही बंधू आपला प्रपंच उद्योग व्यवस्थितपणे सांभाळत आहेत. अनेक वेळा वडिलांना आजारपणाचा सामना करावा लागला. त्यावेळी दोन्ही मुलांनी पैशाकडे न पाहता वडिलांचा जीव महत्त्वाचा मानून पूर्ण ताकद पणाला लावली. पण दुर्दैवाने ते सोडून गेले. आज त्यांची आठवण प्रत्येक कार्याला जगताप परिवारासह पानसवाडी ग्रामस्थांना होत आहे….
वर्षभर त्यांच्या परिवाराला अनेकांनी आर्थिक मानसिक आधार दिला. त्यातून सावरण्याची शक्ती दिली. आता उद्या दगडू भाउ जगताप यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम…. त्यानिमित्त आपण सर्वांनी उपस्थित राहावे. अन अखेरची श्रद्धांजली..अर्पण करावी…हीच अपेक्षा…
ज्ञात अज्ञात सर्व नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार हितचिंतक ग्रामस्थ यांनी वडिलांच्या निधनानंतर आधार दिला.त्या सर्वाचे संतोष भाऊ व नवनाथ भाऊ जगताप यांच्याकडून ऋण निर्देश व्यक्त करण्यात येत आहे.