ब्राम्हणी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन स्व.गजाराम लुमाजी पाटोळे (वय 80) यांचा उद्या गुरुवार 15 ऑगस्ट रोजी दशक्रिया विधी त्यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली.……
अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.गणराज्य न्यूजकडून त्यांच्या दशक्रिया विधी निमित्त जीवन कार्याबद्दल शब्द सुमंजली……✒️
सर्वसामान्य कुटुंबातील असलेले स्व.गजाराम लुमाजी पाटोळे यांनी परिस्थितीला तोंड देत आपल आयुष्य घडवलं.
वडील व मोठ्या भावासोबत मेंढपालन केले.त्यांना चारण्यासाठी मजल दर मजल असा पायी प्रवास केला.उन, वारा,रात्र,अपरात्री मेंढपाळ व्यवसाय करत त्यांनी कौटुंबिक आर्थिक हातभार उंचावण्यासाठी प्रयत्न केला.पत्नी द्वारकाबाई यांची त्यांना प्रपंचात चांगली साथ मिळाली.
पूर्वी रात्रीच्या शाळा असायच्या.रात्री चावडी शाळेत त्यांनी शिक्षण घ्यायचं अन् दिवसभर पोटासाठी काम करायचं. असे अनेक वर्ष केल. स्व.हरी जोशी गुरुजी त्यांना शिकावयला होते. प्रापंचिक व व्यवहारी जीवनासाठी त्यांनी रात्रीच्या चावडी शाळेत पुरेसं शिक्षण घेतल. मेंढी पालनाच्या जोडीला आपली घरची शेती व्यवसाय त्यांनी यशस्वीपणे सांभाळला.
प्रपंचिक जबाबदाऱ्यातून अध्यात्मिक आवड निर्माण करणाऱ्या स्व. गजाराम पाटोळे यांनी श्रीराम सेवा धाम शिंगवे दत्ताचे येथील ह.भ.प सुखदेव महाराज गाडेकर यांच्या समवेत आषाढी पायी दिंड्यात सहभागी होवून अनेक वर्ष वारी गेल्या.
मोठा मुलगा जालिंदर पाटोळे हे 1988 मध्ये सैन्य दलात भरती होवून भारत मातेच्या सेवेसाठी दाखल झाले.तर,लहान असणारे नारायण पाटोळे यांनी वडील,भावाची शेतीची जबाबदारी पार पडली.मुलगी संगीताताई यांना ब्राम्हणी गावातच वाकडे परिवारात दिले. तिन्ही भावंड , जावई सिताराम वाकडे (वायरमन) गुण्यागोविंदाने विविध कार्याच्या माध्यमातून एकत्र येतात.
एक मुलगा देशसेवेत तर दुसरा मुलगा शेतीच्या (भूमातेच्या) सेवेत आपल कर्तव्य पार पाडू लागले.
आपली सेवा पूर्ण करत मुलगा मेजर जालिंदर पाटोळे काही वर्षापूर्वी सैन्य दलातून (2012) सेवानिवृत्त झाले.त्यांना वडिलांसोबत व कुटुंबासमवेत राहून शेती मन रमविले. नोकरी व्यवसायाच्या मागे न लागता कुटुंबाला प्राधान्य देत भाऊ नारायण यांच्या जोडीला त्यांनी उत्तम शेती सुरू केले.माजी सैनिकांच्या संघटनेत काम करत मेजर जालिंदर पाटोळे आपल्या सहकाऱ्यांसमवेत विविध उपक्रम राबवत आहेत.
स्व. गजाराम यांनी श्रीराम सेवा धाम शिंगवे दत्ताचे ह भ प सुखदेव महाराज गाडेकर यांच्या समवेत पायी दिंड्या
लहान मुलगा नारायण यांनी शेती संभालाळी.
2016 व 2022 दरम्यान स्व. गजाराम पाटोळे यांना पॅरालीसीसला दोन वेळा मोठ आव्हान द्यावे लागले. दरम्यान दोन्ही मुले व परिवाराने वेळेत उपचार करत त्यांना आधार दिला.
पॅरेलेसिस दुखण्यावर त्यांनी यशस्वी मात केली. स्वतःच्या पायावर उभे राहिले. नातवंडांचे लग्न,विविध कार्यक्रमात सहभागाचा आनंद त्यांना घेता आला.आज चार नात जावई चार नोकरी व्यवसायात आहेत.प्राध्यापक,मेजर, इजिनियर म्हणून काम करतायेत.
तर मुलांचे मुल इंजीनियरिंग,पोलीस भरती तयारी करत आहे. कुटुंबाला यशस्वीपणे उभा करत त्यांनी निरोप घेतला.
नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही असे म्हणतात. जन्म मृत्यू माणसाच्या हातात नसतो.अखेर त्यांना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला.
6 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना जावून दहा दिवस पूर्ण होत आहे. या दुःखाच्या काळात नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार हितचिंतक यांनी पाटोळे परिवाराला आधार दिला. दुःखातून सावरण्याची ताकद दिली. स्व.गजाराम पाटोळे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
10 दिवस सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आधार दिला. त्याबद्दल मेजर जालिंदर पाटोळे व नारायण पाटोळे यांच्याकडून ऋणनिर्देश…….!