ब्राम्हणीतील गावकऱ्यांच्या संतप्त भावनांचा विचार करून अवैध धंदे व्यावसायिकांची वाढती भाईगिरी रोखण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.सोमवारी आश्वासन दिल्याप्रमाणे पीआय संजय ठेंगे व सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला.पण यामध्ये कायम सातत्य अपेक्षित आहे. एवढीच अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
सोमवारी गुंडगिरी व अवैध धंद्या विरोधात एकीची वर्जमुठ बांधून गाव बंद ठेवण्यात आले. पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांच्या वाढत्या रोषाचा विचार करून मंगळवारी ब्राह्मणी बस स्टँड परिसरातील दारू विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे समजते. गावात राजरोजपणे सर्रास पत्ते खेळणारे जुगारी शांत दिसून आले.पण जुन्या बाजार तळावरील त्या दारू विक्रेत्याने इकडे तिकडे पाहून शटर खालीवर करून सायं दारू विक्रीचा प्रयत्न केल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली. कारवाईत दुजाभाव नको एवढीच अपेक्षा……













